4थी स्कॉलरशिप उतारा वाचा व त्यावरील प्रश्न
1 उतारा व त्यावर आधारित प्रश्न
1. उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक, समजपूर्वक वाचा.
2. उताऱ्यातील आशय समजून घ्या.
3. उताऱ्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन यांबाबतची माहिती नीट लक्षात घ्या.
4. उताऱ्यावर किमान ३ प्रश्न विचारले जातात.
5. प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून पर्यायांतून अचूक उत्तर शोधा.
6. उतारा पुन्हा वाचा. त्यामधील कठीण शब्द, वाक्प्रचार, आलंकारिक शब्द यांचे अर्थ समजून घ्या.
7. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर निश्चित करून योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
8. उताऱ्यावरील प्रश्न मजकुराच्या क्रमाने असतीलच असे नाही.
प्र.पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
उतारा1
हंसापेक्षा लहान असणारा, पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी संचार करणारा पक्षी म्हणजे बदक, तळी, सरोवरे, डबकी या ठिकाणी बदके हमखास दिसणारच. हा पक्षी लहानथोरांचा आवडता पक्षी आहे. बदकांच्या पंखांचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो. आतील भाग मात्र करडा असतो. या पंखावर एक तेलकट थर असतो. त्यामुळे पाण्यात बुड्या मारूनसुद्धा त्यांचे पंख खराब होत नाहीत. बदकांच्या पायांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बोटे कातडीच्या पातळ पडद्यांनी जोडलेली असतात. याचा उपयोग त्याला पाण्यावर तरंगताना होतो. लांबून पाहताना बदक पाण्यावर पुढे सरकताना दिसते पण त्याचे पडदायुक्त पाय वल्ह्यासारखे हलत असतात व बदक मजेत पाण्यावर तरंगते. त्याची चोच जाड व चपटी असते. त्यामुळे मासे सहज पकडता येतात. कीटक, मासे, शेवाळे हे त्यांचे मुख्य अन्न, बदकाची अंडी कोंबडीच्या अंड्यापेक्षा मोठी असतात. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्याने थंडीपासून त्याचे संरक्षण होतेच शिवाय शरीराची उष्णता कायम राहते.
1. बदकाची चोच कशी असते ?
(1) जाड व चपटी ( 2) निमुळती व मोठी (3) मोठी व चपटी (4) बाकदार व चपटी
उत्तर : मोठी व चपटी
2. बदके आपणांस हमखास पुढीलपैकी कोठे दिसत नाहीत?
(1) तळ्यांवर (2) सरोवरांवर (3) शेतांवर ( 4) डबक्याच्या ठिकाणी
उत्तरं: सरोवरांवर
3. पाण्यात बुडूनसुद्धा बदकांचे पंख खराब होत नाहीत; कारण....
(1) पंख करडे असतात. (2) पंखावर खूप पिसे असतात. (3) पंखावर तेलकट थर असतो. (4) पंखाचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो.
उत्तर: पंखाचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो.
उतारा 2
किल्ले म्हणजे महाराजांच्या काळांत स्वराज्याचे रक्षकच, तसा किल्ल्यांचा उपयोग टेहळणीसाठी, देखरेखीसाठी मुलखावर राज्य चालवण्यासाठी होत असे. 'ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी म्हणच होती त्या काळी. किल्ल्यांच डोगरी दुर्ग, भुईकोट किल्ला, जलदुर्ग असे अनेक प्रकार होते. निरनिराळ्या सरदार, वतनदारांच्या गढ़धा असत. गढी म्हणजे पूर्णपणे किल्ले नसत.
दुर्ग म्हणजे किल्ला आणि जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ला. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा हे जलदुर्ग आहेत सिंधुदुर्ग हा सागराने वेहलेला किल्ला असूनही या किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर आहे. येथे छुप्या बोगट्यांचे जाळेही आहे. सुरक्षिततेच्या कारणांमुळे ते आता बंद आहे. तोरणा, पन्हाळा, विशाळगड, प्रतापगड, शिवनेरी हे सर्व डोंगरी किल्ले आहेत. डोंगरी किल्ले म्हणजे गिरिदुर्ग. भक्कम तटबंदी, चिलखती बुरूज, तोफा व बंदुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.
1. पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणतात ?
(1) डोंगरी किल्ला (2) जलदुर्ग (3) गढ़ी (4) भुईकोट
उत्तर: जलदुर्ग
2. डोंगरी किल्ल्यांचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही?
(1) भक्कम तटबंदी (2) सभोवार पाणी (3) चिलखती बुरुज (4) तोफांसाठी सोयीची जागा
उत्तर: चिलखती बुरुज
3. किल्ल्यांचा उपयोग कशासाठी केला जाई?
(1) फक्त टेहळणीसाठी (2) फक्त देखरेखीसाठी (3) फक्त रक्षणासाठी (4) टेहळणी, देखरेख व राज्य चालवण्यासाठी
उत्तर: फक्त टेहळणीसाठी
1 उतारा व त्यावर आधारित प्रश्न
💡(लक्षात ठेवा)
1. उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक, समजपूर्वक वाचा.
2. उताऱ्यातील आशय समजून घ्या.
3. उताऱ्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन यांबाबतची माहिती नीट लक्षात घ्या.
4. उताऱ्यावर किमान ३ प्रश्न विचारले जातात.
5. प्रत्येक प्रश्नाचा व त्यासोबत दिलेल्या पर्यायी उत्तरांचा बारकाईने विचार करून पर्यायांतून अचूक उत्तर शोधा.
6. उतारा पुन्हा वाचा. त्यामधील कठीण शब्द, वाक्प्रचार, आलंकारिक शब्द यांचे अर्थ समजून घ्या.
7. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर निश्चित करून योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
8. उताऱ्यावरील प्रश्न मजकुराच्या क्रमाने असतीलच असे नाही.
प्र.पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
📚नमुना उतारा
उतारा3
हंसापेक्षा लहान असणारा, पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी संचार करणारा पक्षी म्हणजे बदक, तळी, सरोवरे, डबकी या ठिकाणी बदके हमखास दिसणारच. हा पक्षी लहानथोरांचा आवडता पक्षी आहे. बदकांच्या पंखांचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो. आतील भाग मात्र करडा असतो. या पंखावर एक तेलकट थर असतो. त्यामुळे पाण्यात बुड्या मारूनसुद्धा त्यांचे पंख खराब होत नाहीत. बदकांच्या पायांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बोटे कातडीच्या पातळ पडद्यांनी जोडलेली असतात. याचा उपयोग त्याला पाण्यावर तरंगताना होतो. लांबून पाहताना बदक पाण्यावर पुढे सरकताना दिसते पण त्याचे पडदायुक्त पाय वल्ह्यासारखे हलत असतात व बदक मजेत पाण्यावर तरंगते. त्याची चोच जाड व चपटी असते. त्यामुळे मासे सहज पकडता येतात. कीटक, मासे, शेवाळे हे त्यांचे मुख्य अन्न, बदकाची अंडी कोंबडीच्या अंड्यापेक्षा मोठी असतात. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्याने थंडीपासून त्याचे संरक्षण होतेच शिवाय शरीराची उष्णता कायम राहते.
1. बदकाची चोच कशी असते ?
(1) जाड व चपटी ( 2) निमुळती व मोठी (3) मोठी व चपटी (4) बाकदार व चपटी
उत्तर : 1) जाड व चपटी
2. बदके आपणांस हमखास पुढीलपैकी कोठे दिसत नाहीत?
(1) तळ्यांवर (2) सरोवरांवर (3) शेतांवर ( 4) डबक्याच्या ठिकाणी
उत्तरं: 3) शेतांवर
3. पाण्यात बुडूनसुद्धा बदकांचे पंख खराब होत नाहीत; कारण....
(1) पंख करडे असतात. (2) पंखावर खूप पिसे असतात. (3) पंखावर तेलकट थर असतो. (4) पंखाचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो.
उत्तर: 3) पंखावर तेलकट थर असतो.

(स्वाध्याय) उतारा व त्यावर आधारित प्रश्न
प्र.पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :
📚नमुना उतारा
उतारा4
हंसापेक्षा लहान असणारा, पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी संचार करणारा पक्षी म्हणजे बदक, तळी, सरोवरे, डबकी या ठिकाणी बदके हमखास दिसणारच. हा पक्षी लहानथोरांचा आवडता पक्षी आहे. बदकांच्या पंखांचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो. आतील भाग मात्र करडा असतो. या पंखावर एक तेलकट थर असतो. त्यामुळे पाण्यात बुड्या मारूनसुद्धा त्यांचे पंख खराब होत नाहीत. बदकांच्या पायांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बोटे कातडीच्या पातळ पडद्यांनी जोडलेली असतात. याचा उपयोग त्याला पाण्यावर तरंगताना होतो. लांबून पाहताना बदक पाण्यावर पुढे सरकताना दिसते पण त्याचे पडदायुक्त पाय वल्ह्यासारखे हलत असतात व बदक मजेत पाण्यावर तरंगते. त्याची चोच जाड व चपटी असते. त्यामुळे मासे सहज पकडता येतात. कीटक, मासे, शेवाळे हे त्यांचे मुख्य अन्न, बदकाची अंडी कोंबडीच्या अंड्यापेक्षा मोठी असतात. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्याने थंडीपासून त्याचे संरक्षण होतेच शिवाय शरीराची उष्णता कायम राहते.
1. बदकाची चोच कशी असते ?
(1) जाड व चपटी ( 2) निमुळती व मोठी (3) मोठी व चपटी (4) बाकदार व चपटी
उत्तर : 1) जाड व चपटी
2. बदके आपणांस हमखास पुढीलपैकी कोठे दिसत नाहीत?
(1) तळ्यांवर (2) सरोवरांवर (3) शेतांवर ( 4) डबक्याच्या ठिकाणी
उत्तरं: 3) शेतांवर
3. पाण्यात बुडूनसुद्धा बदकांचे पंख खराब होत नाहीत; कारण....
(1) पंख करडे असतात. (2) पंखावर खूप पिसे असतात. (3) पंखावर तेलकट थर असतो. (4) पंखाचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो.
उत्तर: 3) पंखावर तेलकट थर असतो.
📝सरावासाठी उतारे
उतारा 5
किल्ले म्हणजे महाराजांच्या काळांत स्वराज्याचे रक्षकच, तसा किल्ल्यांचा उपयोग टेहळणीसाठी, देखरेखीसाठी मुलखावर राज्य चालवण्यासाठी होत असे. 'ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी म्हणच होती त्या काळी. किल्ल्यांच डोगरी दुर्ग, भुईकोट किल्ला, जलदुर्ग असे अनेक प्रकार होते. निरनिराळ्या सरदार, वतनदारांच्या गढ़धा असत. गढी म्हणजे पूर्णपणे किल्ले नसत.
दुर्ग म्हणजे किल्ला आणि जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ला. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा हे जलदुर्ग आहेत सिंधुदुर्ग हा सागराने वेहलेला किल्ला असूनही या किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर आहे. येथे छुप्या बोगट्यांचे जाळेही आहे. सुरक्षिततेच्या कारणांमुळे ते आता बंद आहे. तोरणा, पन्हाळा, विशाळगड, प्रतापगड, शिवनेरी हे सर्व डोंगरी किल्ले आहेत. डोंगरी किल्ले म्हणजे गिरिदुर्ग. भक्कम तटबंदी, चिलखती बुरूज, तोफा व बंदुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.
1. पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणतात ?
(1) डोंगरी किल्ला (2) जलदुर्ग (3) गढ़ी (4) भुईकोट
उत्तर: 3) गढ़ी
2. डोंगरी किल्ल्यांचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही?
(1) भक्कम तटबंदी (2) सभोवार पाणी (3) चिलखती बुरुज (4) तोफांसाठी सोयीची जागा
उत्तर: (2) सभोवार पाणी
3. किल्ल्यांचा उपयोग कशासाठी केला जाई?
(1) फक्त टेहळणीसाठी (2) फक्त देखरेखीसाठी (3) फक्त रक्षणासाठी (4) टेहळणी, देखरेख व राज्य चालवण्यासाठी
उत्तर:(4) टेहळणी, देखरेख व राज्य चालवण्यासाठी
उतारा 2
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत तुकडोजी महाराज, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नामदेव व संत रामदास असे अनेक संत जन्माला आले. लोकांची सेवा करण्याचे महान मंदिर या संतांनी महाराष्ट्रात उभारले. या मंदिराचा पाया संत ज्ञानेश्वर माउलींनी घातला. संत नामदेवांनी त्याच्या भिंती बांधल्या. संत एकनाथांनी त्यावर घुमट चढवला. संत तुकारामांनी कळस बांधला तर संत गाडगेबाबांनी पताका चढवली. 'गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला' हे संत गाडगेबाबांचे आवडते कीर्तन होते. 'स्वच्छता हाच परमेश्वर' हे लोकांना त्यांनी पटवून दिले होते. सर्व संतांचे म्हणणे एकच आहे, देव माणसात आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा होय. संतांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ।। तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा ।। हा संत तुकारामांचा उपदेश आहे.
1. सर्व संतांचे म्हणणे काय आहे?
(1) देव देवळात आहे. (2) देव माणसात आहे(3) देव दगडात आहे. 4) देव पाण्यात आहे.
उत्तर:2) देव माणसात आहे
2. लोकसेवेचे मंदिर कोणी उभारले ?
(1) देवांनी (2) लोकांनी (3) संतांनी (4) समाजसुधारकांनी
उत्तर: 3) संतांनी
3. 'गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला' हे कीर्तन कोणाचे आवडते होते ?
(1) संत गाडगेबाबा (2) संत तुकडोजी महाराज (3) संत तुकाराम (4) संत एकनाथ
उत्तर: (1) संत गाडगेबाबा
उतारा 6
मधून मधून पक्षी दिसतात. कोणी शेतावर तर कोणी नदीवर. कोणी झाडावर तर कोणी डोंगरावर. काळ्या रंगाचा, सडपातळ असा कोतवाल उडतो, तेव्हा त्याची झेप काय सुंदर दिसते। जणू काही विमानच. शेपटी लांब, चोच काळी अन् डोळ्यांचा रंग तांबडा असा हा कोतवाल. स्वतःच्या रक्षणासाठी मोठ्या पक्ष्यांना तो पळवून लावतो.
नदीजवळून गाडी जाऊ लागली की, नदीत एखादा खंड्या बुडी मारताना दिसतो. छंद मासे मारण्याचा पण पोशाख मात्र सुरेख. चकचकीत निळा व तपकिरी रंगाचा पाणथळी राहणारा हा पक्षी आहे. खंड्याला 'धीवर' पक्षी असेही म्हणतात.
काही शेतांत मोर दिसतात. कधी सुंदर पिसारा उभारून नाच करताना तर कधी झाडाच्या फांदीवर ऐटीत बसलेले. मोराची पाहण्याची व ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण आहे. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. निसर्गाचा हा खजिना आपण जतन करायलाच हवा.
1. नदीजवळून गाडी जाताना कोणती गोष्ट आपले लक्ष वेधून घेते ?
(1) नदीचा प्रवाह
(2) नाचणारा मोर
(3) पाण्यात बुडी मारणारा खंड्या
(4) पक्ष्यांचा थवा
उत्तर:3) पाण्यात बुडी मारणारा खंड्या
2. कोतवाल पक्ष्याला कशाची उपमा दिली आहे?
(1) नदी (2) मासा (3) पाणथळ (4) विमान
उत्तर:4) विमान
3. उताऱ्यातील आशयानुसार चुकीचे विधान कोणते ?
(1) मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे.
(2) कोतवाल पक्ष्याला मासे मारण्याचा छंद आहे.
(3) खंड्याचा पोशाख सुंदर असतो.
(4) मोराची ऐकण्याची क्षमता तीक्ष्ण आहे.
उत्तर:(2) कोतवाल पक्ष्याला मासे मारण्याचा छंद आहे
उतारा 7
जीवनामध्ये मित्राला महत्त्वाचे स्थान आहे. आई, वडील, भाऊ, बहीण ही नाती आपणांस जन्मानेच मिळतात. मित्राचे नाते जन्माने मिळत नाही. ती आपली ऐच्छिक गोष्ट आहे. अनेक वेळा नातेवाइकांपेक्षा मित्रामित्रांमध्ये अधिक जिव्हाळा असतो. मित्र ही जीवनातील अनमोल गोष्ट आहे. चांगला मित्र या शब्दामध्येच प्रेम, विश्वास, आपुलकी दडलेली असते. खरे मित्र दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देतात. सुखाच्या प्रसंगी आनंदात सहभागी होतात. आपल्या उणिवा सांगतात. चुका सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतात. अडचणी सोडवतात. खरे मित्रआरशाप्रमाणे असतात. खरी प्रतिमा दाखवून गुणदोषांचे दर्शन घडवतात. म्हणूनच खऱ्या मित्राला जीवनप्रवाहाला वळण लावणाऱ्या तटाची उपमा दिली आहे. अलंकार हे शरीराला शोभा आणतात. मित्र हे त्याच्याप्रमाणे शोभादायक असता कामा नयेत. फक्त तोंडावर स्तुती करणारेही नकोत; कारण मित्र हे एक अत्यंत खास नातं आहे.
1. खऱ्या मित्राला कशाची उपमा दिली आहे?
(1) अलंकाराची (2) किनाऱ्याची (3) आरशाची (4) प्रवाहाची
उत्तर:3) आरशाची
2. पुढीलपैकी कोणते नाते जन्माने सिद्ध होत नाही ?
(1) मित्र (2) आई (3) बहीण (4) वडील
उत्तर:1) मित्र
3. उताऱ्यातील आशयानुसार खऱ्या मित्राचे कोणते लक्षण नाही ?
(1) खरा मित्र दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देतो.
(2) खरा मित्र आपल्या उणिवा सांगून मार्गदर्शन करतो.
(3) खरा मित्र आनंदात सहभागी होतो.
(4) खरा मित्र फक्त तोंडावर स्तुती करतो.
उत्तर:4) खरा मित्र फक्त तोंडावर स्तुती करतो.
उतारा 8
रविंद्रनाथ टागोर यांचा जन्म बंगालमधील जोरामांको वाड्यात प्रसिदध व सुधारक अशा टागोर कुटुबात ७ मे १८६१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ आणि आईचे नाव शारदादेवी. रविंद्रनाथांसह त्यांची सर्व भावंडे कोणत्या ना कोणत्या कलेत निपुण होती. सतत वाचन करणे हा रविंद्रनाथांचा छंद होता. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच ते सुंदर कविता करीत आणि त्याला कारण म्हणजे त्यांनी अनुभवलेले रम्य बालपण!
निसर्गातील झाडे, पानं, फूल, पक्षी, नदया, पर्वत व आकाश या साऱ्या निसर्गाचं आकर्षण त्यांना होतं घराच्या, शाळेच्या नृत्य, संगीत, चित्र, नाट्य या कलांचे शिक्षण दिले जाई. ते 'भांडार' नावाचे मासिकही चालवत. त्यांच्या 'गीतांजली' या काव्यसंग्रहास नोबेल पारितोषिक मिळाले आणि ते विश्वकवी झाले. सर्वांत आनंददायी गोष्ट म्हणजे जन-गण-मन हे त्यांचे गीत भारताचे राष्ट्रगीत आहे.
1. रविंद्रनाथ टागोर यांना कशाचे विलक्षण आकर्षण होते ?
(1) झाडं, पानं, फुलं (2) पक्षी, नदधा, पर्वत (3) पर्वत, नदी, आकाश (4) साऱ्या निसर्गाचं
उत्तर:4) साऱ्या निसर्गाचं
2. रविंद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या काव्यसंग्रहास नोबेल पारितोषिक मिळाले?
(1) अमृतांजली ( 2) गीतांजली (3) श्यामली (4) स्वरांजली
उत्तर:2) गीतांजली
3. चुकीचे विधान ओळखा :
(1) रविंद्रनाथ यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले आहे.
(2) रविंद्रनाथ विश्वकवी आहेत.
(3) रविंद्रनाथ 'केसरी' मासिक चालवत.
(4) रविंद्रनाथांना वाचनाचा छंद होता.
उत्तर:(3) रविंद्रनाथ 'केसरी' मासिक चालवत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा